बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले नसते – राणे

Narayan Rane-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray

मुंबई :- आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री केले नसते, असे नारायण राणे (Narayan Rane) म्हणालेत. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी टीका त्यांनी केली.

पत्रपरिषदेत उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले – ठाकरे थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. हा माणूस मराठ्यांना आरक्षण कधीही देऊ शकत नाही हा मराठ्यांचा द्वेष करणारा आहे आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thckeray) असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केल नसत.

कळसूत्री बाहुली किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. मोदींच्या जीवावर निवडणूक लढवली म्हणून ५६ आमदार तरी आले पुढच्या वेळी तेवढेपण येणार नाहीत. दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे असे राणे यांनी सांगितले.

त्यांनी ठाकरेंना इशारा दिला, यापुढे माझ्यावर, माझ्या मुलांवर किंवा भाजपावर टीका केली तर तशाच भाषेत उत्तर दिले जाईल. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे म्हणून मी गप्प बसलो आहे. जर मातोश्रीच्या आत काय काय चालतं ते सांगितल तर कपडे घेऊन पळत फिराव लागेल!

ही बातमी पण वाचा : वाघ होतो म्हणून बाळासाहेबानी मुख्यमंत्री पद दिले; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER