भाजपाला धक्का : पुन्हा एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले

मुंबई : मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई (Sameer Desai) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर देसाईंनी शिवबंधन हाती बांधले. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत (Gurudas Kamat) यांचे भाचे आहेत. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवले आहे. सलग दहा वर्षे समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाईंचा भाजपप्रवेश झाला होता. प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपचे सचिवपद देण्यात आले होते. मात्र आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER