ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर चालणाऱ्या गुरदीप कौर

Gurdeep Kaur Chawla Walking with Trump-Modi-Melania on red-carpet

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प भारताच्या दौ-यावर असतानाच ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर असणा-या एका महिलेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्या महिलेचे नाव आहे गुरदीप कौर चावला. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाषांतर करण्याचे (इंटरप्रिटर) काम करतात. रेड कार्पेटवर चालणा-या गुरदीप कौर यांची आज जोरदार चर्चा रंगली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावेळी हिंदीमध्ये भाषण देतात तेव्हा गुरदीप त्याचे इंग्रजी भाषेत भाषांतर करतात. जेणेकरून जगभरातील नेत्यांना मोदींनी केलेले हिंदीतील भाषण समजण्यास मदत होते. अनेकदा त्या मोदींसोबत भारतामध्ये परदेशी नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान सोबत असतात.

गुरदीप यांनी 1990 मध्ये संसदेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र काही काळानंतर त्या आपल्या पतीसोबत अमेरिकेमध्ये शिफ्ट झाल्या. 2010 मध्ये अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसोबत त्या भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्यासाठी भाषांतर करण्याचे काम केले होते.

2014 मध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातही गुरदीप सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि ओबामा यांच्यामध्ये इंटरप्रेटरचे काम केले आहे. गुरदीप कौर चावला यांना सर्व भाषेचे खूप ज्ञान आहे. त्यामुळेच त्यांना एक उत्तम ट्रान्सलेटर मानले जाते.

पंतप्रधान मोदी जेव्हा दौरा करतात तेव्हा गुरदीप स्थानिक भाषेच्या माध्यमातून तेथील लोकांना कनेक्ट करतात. त्यामुळे अनेकदा परदेश दौऱ्यादरम्यान मोदींसोबत त्या असतात.

अमेरिका व भारतात उद्या संरक्षण करार,3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र मिळणार