गुप्तेश्वर पांडे यांचा आज संयुक्त जनता दलात प्रवेश

गुप्तेश्वर पांडे

लखनौ : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SSR) आत्महत्याप्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteswar Pandey) अखेर आज बिहार येथील सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दलात (Samyukta Janata Dal ) प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी अधिकृत पक्षप्रवेश करणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सुशांत प्रकरणात मुंबई व महाराष्ट्र सरकारवर टीका केल्यापासून आयपीएस अधिकारी गुप्तेश्वर पांडे चर्चेत आले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी बोललं जात होतं.

त्यांनी सोमवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केली. त्यानंतर २४ तासांत त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. कार्यकाळ संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असतानाच त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. आज एएनआयनं त्यांच्या जदयुतील पक्षप्रवेशाविषयीचं वृत्त दिलं आहे.

ते आज सायंकाळी संयुक्त जनता दलात प्रवेश करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी २६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट राजकीय नसून डीजीपी या नात्याने घेतली होती, असे पांडे यांनी सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER