काही तासातच गुप्तेश्वर पांडेंचा जनता दलात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता

bihar-dgp-gupteshwar-pandey

पाटणा : सुशांतसिंह आत्महत्या (SSR) प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी मोठे प्रयत्न करणे बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar pandey)काही तासातच अपेक्षेप्रमाणे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या जनता दलात प्रवेश करणार आहेत. दुपारी एक वाजता हा प्रवेश होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी गुप्तेश्वर पांडे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. याशिवाय गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. ही सर्व पार्श्वभूमी पाहता गुप्तेश्वर पांडे हे राजकीय पक्षात प्रवेश करतील असा दावा, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी केला होता. आता हा दावा आता खरा ठरणार आहे.

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी ( २२ सप्टेंबर ) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस घेतल्याने पांडे राजकारणात सक्रिय होतील, अशी चर्चा सुरू होती. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेत राजकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबरला मतदान तर १० नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER