गुंठेवारी निर्णय : कोल्हापुरात अडीच लाख नागरिकांना लाभ

CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : गुंठेवारी योजना नियमित करण्याच्या योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक जणांना लाभ होणार आहे. शहर व ग्रामीण भागातील गुंठेवारी प्रकरणांनाही याचा लाभ होणार आहे.

राज्य शासनाने ऑगस्ट २००१ मध्ये गुंठेवारी अधिनियम कायदा मान्य करून अस्तित्वात आणला. १ जानेवारी २००१ पूर्वी झालेल्या गुंठेवारी योजनांना याचा लाभ देण्यात आला; पण त्या नंतरची गुंठेवारीची प्रकरणे नियमित झाली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून गुंठेवारी प्रकरणे नियमित करून त्या जागेचे एन.ए. व प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी केली जात होती.शहर व परिसरात अनेक जागेचे प्लॉट पाडून त्याची विक्री करण्यात आली; पण हे प्लॉट एन.ए. झाले नाहीत. अनेक प्लॉटवर बांधकामे केली गेली. नवीन शासन आदेशामुळे गुंठेवारी जागेतील बांधकामांचे नियमितीकरण होणार आहे.

ग्राम पंचायत व महापालिकेच्या वतीने नियमाप्रमाणे बांधकाम केली नसल्याचे सांगून दंड आकारून बांधकामे नियमित केली जात होती. तर, काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे बांधली म्हणून ती पाडण्यातही आली. आजही शहर व ग्रामीण भागात गुंठेवारीची अनेक प्रकरणे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. आता शासनाने नवीन आदेशाप्रमाणे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत नियमितीकरणाची परवानगी मिळाली. २००१ ते २००३ या काळात कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात ५० हजारांहून अधिक गुंठेवारी प्रकरणे होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER