छत्रपतींच्या घराण्यांचा अपमान करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही – विनायक मेटे

Vinayak Mete

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्तेंचे नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. आता सदावर्ते यांनी छत्रपतींच्या घराण्यांचा अपमान केल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हणत थेट त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

छत्रपतींच्या घराण्यांचा अपमान केल्याबद्दल अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपतींच्या घराण्याबाबत सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मेटेंनी केला आहे.

जो माणूस छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही, अशा शब्दांत विनायक मेटे यांनी संताप व्यक्त केला आहे.

विनायक मेटे म्हणाले, “अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केलं, ते अतिशय खालच्या पातळीचं आहे. मी अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो.

सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारकडे माझी स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे.” अशी मागणी विनायक मेटेंनी केली.

एवढेच नाही तर, मेटे म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. असा संताप विनायक मेटे यांनी व्यक्त केला.

वकील गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER