गुलजारांनी इतरांच्या प्रेमकहाण्यात रंग भरले पण स्वतःच प्रेम वाचवू शकले नाहीत!

Maharashtra Today

हिंदी सिनेमाचं प्रत्येक दुसरं गाणं गुलजारांनी (Gulzar )लिहलंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही इतकं काम गुलजारांनी केलंय. सिनेमातील गीतांसोबतच त्यांनी अनेक चित्रपट आणि कथा लिहल्यात. साहित्य विश्वात त्यांच नाव मोठ्या आदरानं घेतलं जातंय. तरुणपणी गुलजार प्रसिद्ध अभिनेत्री राखीच्या (Rakhi)प्रेमात होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पुढं त्यांच लग्न झालं पण ते जास्तकाळ टिकलं नाही. दोघांनी एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली होती. परंतू हे लग्न ही जास्तकाळ टिकलं नाही. लग्नानंतर एकाच वर्षात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचं वेगळं होणं आजही अनेकांसाठी मोठा धक्का आहे.

मॅकेनिक म्हणून केली होती सुरुवात

गुलजारांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६चा. अखंड भारतात झेलम जिल्ह्यातल्या दीना गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच खरं नाव होतं ‘संपूर्ण सिंह कारला.’ प्राथामिक शिक्षण त्यांनी गावीच घेतलं. पुढं १९४७ साली भारताचं विभाजन झालं आणि गुलजारांचं कुटुंब भारतात आलं. कुटुंब कबिला पंजाबच्या अमृतसरमध्ये स्थिरावला, कामाच्या शोधात गुलजार मुंबईत आले. फाळणीचा वर्मी घाव काळजावर घेऊन चारचाकी गाड्या रेपेअर करणाऱ्या मेकेनिकचं काम त्यांनी सुरु केलं. इथं ते जुन्या गाड्या रंगवण्याचं काम करीत. त्यांच्या कामातून त्यांना मिळत असलेला मोकळा वेळ त्यांनी शायरी आणि कथा वाचण्यात घालवला. यानंतर हळू हळू त्यांना सिनेमाने आकर्षित केलं. मॅकेनिकचं काम सोडून त्यांनी बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत पाठक यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. वर्ष होतं १९६३ जेव्हा गुलजारांना पहिल्यांदा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ सिनेमात गाणी लिहायची संधी मिळाली होती.

या सिनेमातली गितं प्रसिद्ध झाली पुढं त्यांना एकापाठोपाठ एक कामं मिळत गेली. १९७१ साली त्यांनी ‘मेरे अपने’ या सिनेमात काम केलं. याआधी त्यांनी, आनंद, बावर्ची, नमक हराम, सफर अशा सुपर हिट सिनेमांसाठी गीत लेखन केलं होतं. त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला प्रेक्षकांसह समिक्षकांकडून त्यांच प्रचंड कौतूक झालं.

राखी

१९७० ला ‘राखी मुजुमदार’ ने बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. तिचा पहिला सिनेमा ‘जीवन- मृत्यू’ प्रंचड गाजला. सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. राखीनं घटस्फोट घेतला होता. अशातच तिचा परिचय गुलजारांसोबत झाला. गुलजारांना बंगाली लोक आणि तिथल्या संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण होतं. याच कारणामुळं त्यांनी बंगालमधून आलेल्या राखीकडे आकर्षित झाले. राखीला देखील गुलजारांच्या गीतांनी संमोहित केलं होतं. दोघे एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. पाहता पाहता ते प्रेमात पडले आणि परत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९७३ ला दोघांनी लग्न केलं. या लग्नाला राजेश खन्ना, जितेंद्र आणि अमिताभ यांच्यासह बॉलीवूडमधील सर्व प्रमुख मंडळी उपस्थीत होती. दोघांनी एका मुलीला जन्म दिला तिचं नाव ‘मेघना’ ठेवण्यात आलं होतं.

लग्नाला एक वर्ष उलटलं आणि दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली. लग्नानंतर राखीनं सिनेमांमध्ये काम करु नये अशी गुलजार यांची अट होती. राखीनं हे मान्य केलं. जे सिनेमे गुलजार दिग्दर्शित करतील त्यातच भूमिका मिळेलं असं गुलजारांनी राखीला सांगितलं होतं परंतू गुलजारांना सिनेमे मिळाले पण राखीला भूमिका मिळाल्या नाहीत. असं दिर्घकाळ सुरु राहिलं शेवटी राखीच्या संयमाचा बांध फुटला. अशातच काश्मिरला एका सिनेमाचं शुटींगसाठी गुलजार गेले होते सोबत राखी होती.

सिनेमाचे हिरो संजीव कपूर यांनी भरपूर दारु पिल्यानंतर अभिनेत्री सुचित्रा सेन यांची छेड काढली. प्रसंगावधानता दाखवत गुलजारमधे पडले. त्यांनी सुचित्रा सेन यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडलं. गुलजारांवर यामुद्द्यावर राखी नाराज झाल्या. तेव्हा यश चोपडा ‘कभी- कभी’ या सिनेमाची ऑफर घेऊन राखीकडं आले. राखीने गुलजारांना विचारात न घेता चित्रपटात काम करायला होकार कळवला. दोघात भांडण झालं आणि त्याचं रुपांतर घटस्फोटात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button