कॅटरीना कैफला किस करण्यापूर्वी दोन तास प्रॅक्टिस केली होती गुलशन ग्रोव्हरने

Maharashtra Today

कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडची आघाडीची नायिका आहे. आज जवळ जवळ सर्वच मोठ्या नायकांसोबत आणि मोठ्या बॅनरचे सिनेमे कॅटरीना करीत आहे. मात्र याच कॅटरीनाने बॉलिवूडमध्ये अत्यंत टुकार अशा ‘बूम’ (Boom) नावाच्या सिनेमातून एंट्री केली होती. खरे तर या सिनेमात अमिताभ बच्चन, (Amitabh Bachchan) जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), झीनत अमान (Zeenat Aman) असे मोठे कलाकार होते. मात्र दिग्दर्शक कैझाद गुस्तादने हा सिनेमा सेक्सने भरून प्रेक्षकांसमोर सादर केला होता. कॅटरीनाने या सिनेमात एका मॉडेलची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरलेल्या या सिनेमात कॅटरीना कॅफने मनसोक्त अंगप्रदर्शन केले होते. एवढेच नव्हे तर कॅटरीना आणि बॉलिवूडमध्ये बॅड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन ग्रोव्हरसोबत (Gulshan Grover) कॅटरीनाने एक अत्यंत इंटिमेट असा किसिंग सीन दिला होता. २००३ मध्ये हा सिनेमा आला होता आणि त्यावेळी हा सीन खूपच चर्चेत आला होता. आजही यूट्यूबवर कॅटरीना आणि गुलशन ग्रोव्हर या दोघांना हा किसिंग सीन सगळ्यात जास्त पाहिला जात आहे. मात्र या सीनसाठी मी तयार नव्हतो आणि हा किसिंग सीन देण्यासाठी मी दोन तास बंद रूममध्ये प्रॅक्टिस करीत होतो असे गुलशन ग्रोव्हरने एका मुलाखतीत सांगितले.

कॅटरीनासोबतच्या किसिंग सीनबाबत बोलताना गुलशन ग्रोव्हरने सांगितले, तो खूपच कठिण असा सीन होता. याचे महत्वाचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासमोर मला तो सीन करायचा होता. त्यामुळे मला भिती वाटत होती. दुसरी गोष्ट अशी की, कॅटरीनाचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता त्यामुळे ती स्वतःही या सीनसाठी कंफर्ट नव्हती. दिग्दर्शक कैझादने आम्हा तिघांना सीन समाजावून सांगितला होता. मी आणि अमिताभ बच्चन खुर्चीवर बसलेले असताना कॅटरीना कैफला टेबलवर चढून बसायचे होते आणि माझी कॉलर पकडून तिच्याकडे खेचून किस करायचा होता. पण आम्ही दोघेही कंफर्ट नव्हतो. त्यामुळे हा सीन शूट करण्यापूर्वी एका बंद रूममध्ये मी दोन तास प्रॅक्टिस करीत होतो. त्यानंतर दिग्दर्शकाने अॅक्शन म्हणताच, कॅटरीनाने मला जवळ ओढले आणि माझा किस घेतला. दिग्दर्शकाने जेव्हा कट म्हटले तेव्हा आम्हाला जाणवले की, हा सीन चांगला झाला आहे. कॅटरीनाने खूपच आत्मविश्वासाने तो किसिंग सीन दिला होता. माझ्यासाठी आणि कॅटरीनासाठीही हा सगळ्यात कठिण सीन होता असेही गुलशन ग्रोव्हरने या मुलाखतीत सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button