गुलाबराव पाटलांचे राजकीय बाण्यासोबतच गाण्याचेही कौशल्य, जाहीर कार्यक्रमात गायलं ‘बॉलिवूड साँग’

Gulabrao Patil

जळगाव : राजकीय नेते राजकारणात जसे तरबाज आहेत तसे अनेक नेत्यामध्ये कलेचे सुप्त गुणही दडलेले आहेत. मात्र, राजकीय क्षेत्रातील सातत्याच्या व्यस्ततेमुळे अनेकदा नेत्यांना आपले इतर छंद पूर्ण करता येत नाहीत. मात्र संधी मिळताच नेत्यांमधील सुप्त गुण बाहेर येतात आणि समोरच्यांना सुखद आश्चर्याचा धक्काच देतात.

शिवसेनेचे (Shiv Sena) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याही हातात माईक आला आणि वेळ पाहून त्यांनी आपल्यातल्या सुप्त कलेला वाव देण्याची संधी मिळाली.

प्रजासत्ताक दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथे एका खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमाप्रसंगी हिंदी चित्रपटातील ”तेरी मेहरबानीया” हे गीत सादर केले. त्यांच्या गाण्याने उपस्थितही भारावून गेले आणि त्यांनी पाटील यांच्या गायनाला भरभरून दादही दिली.

गुलाबराव पाटील यांच्या गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे वत्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी तारुण्यात नाटकातही अभिनय केला आहे. पोवाडे सादर करणे, गाणे म्हणणे मला आवडते. मी अनेक स्टेज गाजवले आहे, असंही ते म्हणाले.

सौजन्य : TV9Marathi
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER