एकनाथ खडसेंवर त्यांच्या पक्षाने अन्याय केला; शिवसेनेच्या नेत्याची टीका

Gulabrao Patil - Eknath Khadse

जळगाव : भाजप (BJP) अध्यक्ष जे.पी.नड्डा (J P Nadda) यांनी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना स्थान देण्यात आलेले नाही . याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केले .

राष्ट्रीय कार्यकारिणी हा भाजपचा विषय आहे, त्यावर बोलणे संयुक्तिक नाही. मात्र, एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर निश्चितच भाजपने अन्याय केला आहे, असे पाटील यांनी म्हटले.

दरम्यान भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी शनिवारी जाहीर झाली. (BJP working committee) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवरून वगळण्यात आले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER