नारायण राणे सेनेमुळेच मोठे झाले अन् रस्त्यावरही आले- गुलाबराव पाटील

Narayan Rane-Gulabrao Patil

जळगाव : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती . यावरून पाटील यांनी राणेंवर निशाणा साधला आहे .

ही बातमी पण वाचा:- राष्ट्रपती राजवटीची मागणी राणेंची वैयक्तिक; भाजपाचा संबंध नाही – सुधीर मुनगंटीवार

नारायण राणे यांचे शिवसेनेशी जुने नाते आहे. ते शिवसेनेमुळेच मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे त्यांचे नाते प्रेमाचे पण आहे, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी नारायण राणेंना लगावला आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशावर मोठी आपत्ती निर्माण केली आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल गुजरात, दिल्ली व उत्तरप्रदेशातही करावी लागेल. मात्र या काळातही काही जण राजकारण करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER