… म्हणून नाथाभाऊंवर ही वेळ आली : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil and Eknath Khadse

मुंबई : नाथाभाऊंनी मला वडिलांसारखं प्रेम दिले . मात्र मुलगा कधी मानलं नाही. त्यामुळे ही वाईट वेळ आली, अशी राजकीय टोलेबाजी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे .

भुसावळ येथे गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला . पाटील म्हणाले, “भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं. मात्र मुलगा कधी मानलं नाही. त्यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता, तर मी पक्का माणूस आहे. कधीही पाठिंमागे हटलो नसतो,” असं पाटील यांनी सांगितले .

“नाथाभाऊंनी सोबत ठेवलेल्या लोकांचा रक्तगट कधी तपासला नाही. त्यांनी रक्तगट तपासून माणसं ठेवली असती, तर गुलाबराव पाटलांसारखा सच्चा माणूस कधीही तुटला नसता. तुटू शकणारही नाही. कालसुद्धा रक्षा खडसे लोकसभेला उभ्या राहिल्या. तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. माझी मागची दुश्मनी काढली नाही. मला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाहायचे होते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.