लव्ह मॅरेज केलं असतं तर आज राज्यात युतीची सत्ता असती – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil - Girish Mahajan

जळगाव :- आज सत्ता आहे, पण उद्या कोणाची सत्ता येईल, हे सांगता येत नाही. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती. त्यांनी राज्यात जे केले, तेच महापालिकेतही केले. तेव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती. पण ते आपल्या हातात नाही. वरचे लोक काय करतात, कार्यकर्ता म्हणून जो रोल आपल्याला दिला जातो, तो आपल्याला करावा लागतो, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप (BJP) नेते गिरीश महाजन यांना उद्देशून लगावला.

जळगाव जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात आज (20 फेब्रुवारी) राजकीय विषयांवरून चांगलाच कलगीतुरा रंगला. महापालिकेच्या वतीने आज दुपारी केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हे दोघी नेते एकाच व्यासपीठावर होते. यावेळी दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांना राजकीय चिमटे मारण्याची संधी सोडली नाही.

आपल्या भाषणात गिरीश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार चिमटे घेतले. ते म्हणाले, पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचे लोकार्पण होत आहे. या परिसरात शिवसेनेचे अवघे तीन नगरसेवक आहेत. महापालिकेत आमचे संख्याबळ जास्त आहे. पण आम्ही दुजाभाव केला नाही. हे राज्यात आदर्श ठरणारे उदाहरण आहे. पण राज्यात असे घडले नाही. आमच्या मतदारसंघाचे पैसे तुम्ही पळवले. सत्ता आपली आहे, काल तुमची सत्ता होती. उद्या आमची सत्ता असेल, काही सांगता येत नाही. उद्या-परवा आपली सत्ता असेल. आज तर मला याठिकाणी युतीची सत्ता आहे, असेच वाटतेय. भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना!  ; महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER