गुज्जर आरक्षण आंदोलन : राजस्थानात सात जिल्ह्यात एनएसए, इंटरनेट बंद

Gujjar reservation movement

जयपूर : राजस्थानामध्ये आरक्षणावरून गुज्जर आंदोलन पुन्हा पेटण्याची लक्षणं दिसत आहेत. १ नोव्हेंबरपासून गुज्जर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू करणार आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने सात जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे व इंटरनेट सेवा बंद केली आहे.

राजस्थानमधील गुज्जर समाजाकडून काही वर्षांपासून आरक्षणाची मागणी करतो आहे. यासाठी गुज्जर समाज अनेक वेळा रस्त्यावर उतरला. आक्रमकपणे आंदोलन केली आहेत. आता पुन्हा एकदा उद्या (१ नोव्हेंबर) पासून आंदोलनाची हाक दिली आहे.

मागील अनेकवेळा ही आंदोलनं हिंसक झाली आहेत. यावेळी सरकारने आधीच खबरदारी म्हणून भरतपूर, धोलपूर, सवाई, माधोपूर, दौसा, टोक, बुंदी आणि झालावाड या जिल्ह्यांत एनएसए कायदा लागू करण्यात आला आहे. करौली, भरतपूर, जयपूर आणि सवाई माधोपूर या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये बंदोबस्त वाढण्यात आला असून, अतिरिक्त पोलीस दलाच्या तुकड्या बोलावल्या आहेत.

गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे नेते विजय बैसला म्हणाले, १ नोव्हेंबरपासून पिलुपूरापासून आंदोलन सुरू होणार आहे. सरकारने मागील दोन वर्षात समाजाच्या मागण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले आहे. आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER