गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’ देशापुढे उघड; काँग्रेसची टीका

Ananat Galgill - Maharashtra Today

मुंबई :- २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’च्या भरवशावर सत्ता प्राप्त केली, त्याच गुजरातमध्ये  कोरोनाची दुसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्दल केवळ स्थानिक प्रसारमाध्यमांनीच खरी वस्तुस्थिती मांडत सरकारची नाचक्की केली नाही तर गुजरात उच्च न्यायालयानेही (High Court) नाराजी व्यक्त करीत फटकारले. यामुळे, गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’च आता देशापुढे उघड झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी केली आहे.

उत्तरप्रदेशात एकीकडे एका मैदानात सामुदायिकरीत्या शेकडो प्रेतांना अग्नी दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी छापली. तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहात असल्याची दृश्ये सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली. उत्तरप्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’ बनत चालल्याचे गाडगीळ म्हणाले. गोव्यात ऑक्सिजन न मिळाल्याने शेकडो जण मृत्युमुखी पडले आहेत. “मुख्यमंत्र्यांवर राणेंची (विश्वजित) आगपाखड” हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे, असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, बंगळुरू शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या कोरोना-मृतांसाठी राखीव ठेवाव्या लागल्या आहेत. ही सगळी परिस्थिती बघता भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच मोदी मॉडेलचा फज्जा उडाल्याचे गाडगीळ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button