गुजराती भाई शिवसेनेत ; हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही म्हणत मनसेचे शिवसेनेविरुद्ध आंदोलन

Shiv Sena - MNS

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार सत्तेत आल्यापासूनच मनसे वुरुद्ध शिवसेना अशी लढत तीव्र झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) शपथविधीच्याच दिवशी राजपुत्र अमित ठाकरेंचे (Amit Thackeray) आंदोलन ते आतापर्यंतच्या अनेक घटनांवरून मनसेने (MNS) शिवसेनेविरुद्धचा (Shiv Sena) लढा अधिक तीव्र केलेला दिसत आहे.

नुकतेच भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता (Hemendra Mehta) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पोस्टरही लावण्यात आलेत. मात्र, मराठीसाठी आग्रंही असलेल्या मनसेला ही गुजराती भाषेतील पोस्टर्स खटकली आणि यावर मनसेने काही चिठ्या चिकटवत ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ असा मजकूर लिहून सेनेविरुद्ध आंदोलन छेडले.

काही दिवसांपुर्वीच भाजपचे (BJP) नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपची साथ सोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधले. त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर स्वागतासाठी बोरीवलीत पोस्टर लावण्यात आले त्या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला. यामुळे त्यावर मनसेने काही चिठ्या चिटकवण्यात आल्या. ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशाप्रकारचे मजकूर लिहिण्यात आले होते. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER