गुजरात : ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा १५ जूनपासून होणार लागू

Vijay Rupani - Anti-Love Jihad Law
Vijay Rupani - Anti-Love Jihad Law

गांधीनगर : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायद्याला (Anti-Love Jihad) मंजुरी दिली आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी ही माहिती दिली.

हा कायदा गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारित केला होता. तो मंजुरीसाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवण्यात आला होता. हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतर रोखण्यासाठी माझे सरकार ‘लव्ह जिहाद विरुद्ध’ कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी निवडणूक प्रचारसभेत सांगितले होते. मोठ्या गदारोळात गुजरातच्या विधिमंडळात धर्मस्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले होते.

१० वर्षांची शिक्षा
हा कायदा मंजूर झाल्याने जबरदस्ती, आमिष दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपीला १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. धर्म लपवून विवाह केल्यास पाच वर्षांची शिक्षा आणि दोन लाखांचा दंड असणार आहे. अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास सात वर्षांचा तुरुंवास आणि तीन लाखांचा दंड होऊ शकतो. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना तीन लाखांचा दंड आणि सात वर्षांची शिक्षा असणार आहे.

धर्मांतर करण्याच्या हेतूने एखाद्या महिलेशी लग्न करून तिची फसवणूक रोखण्यासाठी हा कायदा संमत करण्यात आला आहे. या विधेयकात २००३ च्या कायद्यात संशोधन केले आहे. त्यात जबरदस्तीने प्रलोभन देऊन धर्मांतरण करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button