गुजरात दंगल ही गोध्रा हत्याकांडावरची रिअ‍ॅक्शन होती : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई :- गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल (Gujrat riots) ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिअ‍ॅक्शन) होती, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले, त्यानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. त्यामुळे ही एक रिअ‍ॅक्शन म्हणावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे : नवाब मलिक

ते बुधवारी मुंबईत (Mumbai) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या आणीबाणी ही एक चूक असल्याच्या कबुलीबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आता इतक्या वर्षांना राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER