गुजरात नप, पंचायत निवडणुकीनंतर मोदींनी मानले आभार; काँग्रेसच्या नेत्यांचे राजीनामे

PM Narendra Modi

अहमदाबाद : गुजरातमध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व विजय मिळविला. मतदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासासाठी मोदींनी आभार मानले. या निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला. राज्यातील काँग्रेसचे नेते राजीनामे देत आहेत.

भाजपाने १९६७ जागा जिंकल्या. काँग्रेस ३५६, आप ९ जागांवर विजयी झाले आहेत. पंचायत निवडणूकांमध्येही भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे; ७३५ जागा जिंकल्याचा. काँग्रेसला १५७ , आम आदमी पार्टीला २ जागा मिळाल्यात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. गुजरातच्या जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे, की जनता विकास आणि उत्तम प्रशासन यांच्या बाजूने राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत.

प्रदेश काँग्रेसमध्ये मात्र, निराशा पसरली असून प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि विधिमंडळ पक्षनेते परेश धनानी यांनी नगरपालिका, पंचायत निवडणूकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदांचे राजीनामे दिले आहेत. आम्ही लोकांसाठी काम करीत राहू. विधानसभेच्या निवडणूकीत जनतेला भाजपाला पराभूत करण्याचे आवाहन करू, असे चावडा म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER