
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. जी.आर. उधवानी यांनी शनिवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. न्या. उधवानी ५९ वर्षांचे होते. १५ वर्षे कनिष्ठ न्यायालयांत न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर न्या. उधवानी यांची सन २०१२ मध्ये उच्च न्यायालयावर नेमणूक झाली. एक कर्तव्यदक्ष व सत्शील न्यायाधीश हरपल्याची हळहळ त्यांच्या निधनाने वकीलवर्गात व्यक्त केली गेली. देशात कोरोनाच्या साथीला बळी पडलेले न्या. उधवानी हे बहुधा पहिले वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला