अमित शहा – शरद पवारांची भेट झाली ; पत्रकार स्वाती चतुर्वेदीचा दावा

Sharad Pawar - Amit Shah - Swati Chaturvedi - Maharashtra Today

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) – प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची अहमदाबादेत भेट झाली. यजमानांच्या घरी शाकाहारी डिनरही झाले; पण ही भेट गुप्त ठेवण्यासाठी अहमदाबाद पोलिसांना अमित शहांच्या आणि शरद पवारांच्या मुव्हमेंटचे रेकॉर्ड न ठेवण्यास सांगण्यात आले होते, तसेच मुव्हमेंटसाठी स्पेशल अरेंजमेन्ट करण्यासही नकार देण्यात आला होता, असा दावा पत्रकार स्वाती चतुर्वेदीने (Swati Chaturvedi) केला आहे .

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे यजमानांच्या घरी ४५ मिनिटे आधी पोहचले. त्यांनी यजमानांसमवेत चर्चा केली. त्यानंतर अमित शहा तेथे आले. डिनरचा मेन्यू शाकाहारी होता. ज्या वेळेस पवारांचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) १०० कोटींच्या वसुलीकांडात अडकलेत त्यावेळी अमित शहा – पवार यांची डिनर डिप्लोमसी रंगणे, हा शिवसेनेसाठी आणि काँग्रेससाठी वेगळा सिग्नल आहे, असे स्वातीने आपल्या लेखात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबादमधील भेटीचं वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेटाळण्यात आलं आहे. मात्र भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे या भेटीची चर्चा कायम आहे.

पवारांचे निकटवर्ती संजय राऊतांनी (Sanjay Raut) आणि खुद्द राष्ट्रवादीने अमित शहा – पवार भेटीचा इन्कार केला असला तरी ही भेट झाली. डिनरही झाले, असा दावा स्वाती चतुर्वेदीने लेखात केला आहे.

अमित शहा – पवार भेट कन्फर्म करणारी स्वाती चतुर्वेदी ही पहिली पत्रकार नाही. त्यापूर्वी पायोनिअरचे शोधपत्रकार जे. गोपीकृष्णन यांनीदेखील अमित शहा – शरद पवार यांची भेट झाली आहे आणि ती अहमदाबादमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी झाली आहे, असे ट्विट केलेच होते.

देशातले सगळ्यात मोठे घोटाळे उघडकीस आणणारे पत्रकार म्हणून गोपीकृष्णन ओळखले जातात. त्यांनी अमित शहा – शरद पवार भेटीचे ट्विट केले होते, की “इंटरेस्टिंग… महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू असताना अदानींच्या घरी अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. ” गोपीकृष्णन यांचे ते ट्विट टाइम्स नाऊच्या पत्रकार मेघा प्रसाद यांनी रिट्विट केले होते. अमित शहांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिलेले उत्तर, कुछ बाते सार्वजनिक नही करते, हेदेखील गोपीकृष्णन यांनी ट्विट केले होते.

एकीकडे वरिष्ठ पत्रकार दोन्ही नेत्यांच्या भेटीची बातमी वेगवेगळ्या माध्यमातून कन्फर्म करीत असताना संजय राऊत आणि नबाब मलिक या शिवसेना – राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून मात्र या भेटीचे इन्कार येत आहेत. याचा अर्थ पवारांच्या इच्छेशिवाय या बातम्या बाहेर आल्यात का ? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button