
अहमदाबाद : गुजरातमध्ये झालेल्या सहा महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाची निर्विवाद विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपा सर्व सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने चालली आहे, तर काँग्रेसची मोठी घसरण झाली आहे.
अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महानगरपालिकांमध्ये भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत ११९ जागांचे कल आले भाजपाने १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. बडोदा महानगरपालिकेच्या ७६ पैकी ५३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या खात्यात केवळ ७ जागाच जाताना दिसत आहेत.
सूरतमध्ये आतापर्यंत १२० जागांपैकी ६४ जागांचे कल आले आहेत. भाजपा ५१ तर आप १३ जागांवर आघाडीवर आहे. तर राजकोटमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ७२ पैकी ५२ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे.
जामनगरमधील संपूर्ण निकाल हाती आले असून भाजपाने ५१ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला १० आणि इतरांना ३ जागा मिळाल्या आहे. भावनगरमध्ये ५२ पैकी ४८ जागांचे कल आले आहेत. भाजपा ४० तर काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला