गणेशोत्सव ; ई – पास करिता महाराष्ट्र शासनाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Guidelines issued for Ganeshotsav

मुंबई :-  येत्या 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (Ganeshotsav) आहे. यंदा सार्वजनीक गणपतींवर कोरोनाचे सावट असले तरी. कोंकणात आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही दरवर्षीप्रमाणे यंदाही घरोघरी गणुपती विराजमान होतील.

कोंकणवासी मुंबईतील चाकरमान्यांसाठी गणपती हा सण विशेष असतो. यंदाही कोरोनाचे सावट असले तरी मुंबईतील चाकरमानी कोंकणात गावी घमपतीला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maha Govt) अशा चाकरमान्यांसाठी मुंबईतून विशेष बस सुरू केल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र शासनातर्फे ई -पास साठी मुंबईच्या संकेत स्थळावर आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

अतिरिक्त नवीन ऑप्श्न म्हणजेच गणेशोत्सवासाठी परवानगी अशी सोय ई – पास (E-Pass) मध्ये करण्यात आली आहे.

या सेवेत सर्व विभागीय डीसीएसपी व उप- पोलिस आयुक्त (ऑपरेशन्स), मुंबई (Mumbai) यांना अधिकृत करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवासाठी जाणा-यांना ई-पास जारी करा असेही शासमनातर्फे संबंधित अधिका-यांना सांगण्यात आले आहे. अनावश्यक विलंब टाळून पारदर्शकता कायम ठेवून अधिका-यांनी गणेशभक्तांना त्वरीत ई – पास जारी करावा अशा सुचना महाराष्ट्र सरकारने अधिका-यांना केल्या आहेत.

यासंदर्भातलेमहाराष्ट्र शासनाचे पत्र या वृत्ताला जोडले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER