गुग्गुळ – देवधूप, अनेक व्याधीहर औषध !

guggul-benefits-uses

गुग्गुळ (Guggul) अनेक घरामधे सायंकाळी धूपन म्हणून लावल्या जातो. गुग्गुळाचे धूप बाजारात उपलब्ध असतात. गुग्गुळाचा सुगंधी, वातावरण शुद्ध करणारा असल्याने अनेक जण वापरतात.

गुग्गुळ हा झाडाचा निर्यास असतो. पाऊस कमी पडतो अशा प्रदेशात ही वनस्पती उगवते. सूर्य किरणांच्या तीव्र उष्णतेमुळे उन्हाळ्यात गुगुळाच्या झाडातून हा निर्यास पाझरू लागतो. शिशिर व हेमंत ऋतुमधे जेव्हा घट्ट होऊन हा डिंक गोळा स्वरूपात तयार होतो त्यावेळी खरडून काढल्या जातो. असा हा गुग्गुळ औषधी कल्पांमधे, धूपन स्वरूपात वापरल्या जातो.

गुग्गुळात भेसळ खूप प्रमाणात केली जाते. शुद्ध गुग्गुळ कसा ओळखावा याकरीता आयुर्वेदात (Ayurveda) काही परीक्षा सांगितल्या आहेत.

खरा गुग्गुळ कसा ओळखावा ?

Guggul Dhoop

  • अस्सल खरा गुग्गुळ अग्नीवर जळतो. उन्हात पातळ होतो. गरम पाण्यात विरघळवला तर त्याला दुधासारखा रंग येतो. आयुर्वेदात असा गुग्गुळ औषधांमधे वापरण्यास सांगितला आहे.
  • गुग्गुळ वृक्षाला देवधूप ( देवाला धूपन स्वरूपात वापरल्या जातो) कौशिक ( वृक्षाच्या कोशात असतो) पुर ( औषधांमधे श्रेष्ठ) महिषाक्ष ( म्हशीच्या डोळ्यासारखा कृष्णवर्णी) पलंकष ( स्थौल्य कमी करणारा) अशी विविध नावे आली आहेत.
  • औषधी निर्माणात झाडापासून संकलन केलेला गुग्गुळ शुद्ध करून घेतला जातो. पुराण गुग्गुळ अधिक गुणवान सांगितला आहे.
  • गुग्गुळ वातशमन करणाऱ्या वनस्पतींमधे प्रमुख आहे. मेद कमी करणारा आहे. शूल वेदना कमी करणारा आहे. सूज कमी करणारा आहे.
  • Guggul Benefits
  • अन्नवह प्राणवह मूत्रवह प्रजनन संस्थान रक्तवह अशा प्रत्येक अवयवाच्या व्याधींकरीता विविध औषधी संयोगाने गुग्गुळ कल्प बनविले जातात. अर्श ( मूळव्याध ) गाठ होणे, भगंदर, अस्थिभंग, अश्मरी ( किडनी स्टोन) वंध्यत्व शुक्रदोष अशा अनेक व्याधींवर गुग्गुळ कल्प उपयोगी आहे.
  • सर्वोतम वातशामक असल्यामुळे संधिवात आमवात सियाटिका पक्षाघात अशा अनेक वात विकारांवर गुग्गुळ वापरून तयार केलेली औषधे कार्यकारी असतात.
  • गुग्गुळ वातावरण शुद्धीकर आहे हे आपण जाणतोच याशिवाय व्रण जखम डायबेटिकवूंड लवकर ठिक होण्याकरीता गुग्गुळाचा धूपन करतात. यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात.

त्रिफळा गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, गोक्षुरादि गुग्गुळ अमृता गुग्गुळ अशी 80 च्यावर गुग्गुळ पासून निर्मित कल्पांचे वर्णन आयुर्वेदात विविध व्याधींच्या चिकित्सेकरिता आले आहे. या कल्पांचा उपयोग आयुर्वेद तज्ज्ञ करीत असतात.

असा हा गुग्गुळ देवधूप म्हणून उपयोगी आहेच पण शरीराकरीता पुर (औषधात श्रेष्ठ) आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER