गुढीपाडवा – आरोग्याची काळजी घेणारे आपले सण !

सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज कारोनाच्या सावटाखाली आपण सर्वच सण साजरा करीत आहोत. घरच्या घरी का होईना गुढी उभारून प्रत्येकानेच जमेल तसा आजचा सण साजरा केला असेल. चैत्र महिन्याची सुरवात म्हणजे आपल नवीन वर्ष ! गुढीपाडवा याच मुहुर्तावर तिथीवर साजरा का करावा याला ऐतिहासिक आध्यात्मिक महत्त्व आहेच. याशिवाय गुढी उभारतांना वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांचे आरोग्याकरीता अतिशय महत्त्व आहे.

गोड पदार्थ तर आपण आज करतोच पण कडूलिंब चटणी मात्र हमखास केली जाते. कडूलिंबाची कोवळी पाने फुलं घेऊन धणे जीरं गुळ सैंधव चिंच घालून ही चटणी केली जाते. कडूलिंब हे कडू रसाचे रक्त शुद्धी करणारे, साथीचे आजार कांजण्या गोवर त्वचा विकार दूर करणारे असल्याने वसंतातील सर्वच व्याधी दूर होतात. जंतुघ्न असल्यामुळे दारावर कडूलिंब लावतात. किटकांपासून रक्षण होते. स्नानाच्या पाण्यात टाकल्याने त्वचा विकार दूर होतात. घामोळ्या होत नाही. घामाचा दुर्गंध, खाज सुटत नाही.

साखरेची गाठी आज वाहिली जाते. उष्णतेमुळे थकवा जाणवतो पित्त वाढते यावर साखर पाणी लगेच ताकद देणारे त्यामुळे येणाऱ्या ऋतुला सुसह्य करणारे हे एक द्रव्य.

आंबा, आंब्याची पानं, कैरीची डाळ कैरीचे पन्हे चैत्रात विशेष महत्त्व. आंबा हा फळांचा राजाच याचे गुणवर्णन आधीच्या लेखात वाचले असेलच.

आपले सण हे आध्यात्मिक ऐतिहासिक आधारे तर आहेच पण प्रत्येक ऋतु परिवर्तनाचे शरीरावर होणाऱ्या परीणामांचा विचार करून आरोग्य चांगल राहण्याच्या दृष्टीने साजरे केले जातात. गुढी पाडवा साडेतीन मुहुर्तापैकी एक; त्यामुळे आजच्या मुहुर्तावर स्वास्थ्य रक्षक आयुर्वेदोक्त दिनचर्या, ऋतुचर्या पालन त्यामागील शास्त्र समजून सुरु करूया व रोगांना दूर ठेवूया.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button