दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी पालकमंत्री ठाकूर खंबीरपणे पाठीशी

Maharashtra Today

अमरावती : दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण खंबीरपणे चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असे महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी रविवारी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला भेट दिली. त्यांच्या कुटुंबांना सांत्वन करून दिलासा दिला. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून मी खंबीरपणे पाठीशी राहीन, अशी ग्वाही यशोमती ठाकूर यांनी दिली. यावेळी दीपाली यांचे पती राजेश मोहिते, सासू, दीर व नातेवाईक उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री यांनी दीपाली चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. दिवंगत दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू. अशा प्रकारची घटना या पुढे घडू नये, यासाठी विशाखा समिती तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. मेळघाटात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची माहीती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button