मास्कबाबत पालकमंत्री सतेज पाटलांची पोस्ट व्हायरल

Satej Patil

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आज शनिवारी कसबा बावडा येथील आपल्या निवासस्थानातून शहराकडे जात असताना शाळेतील काही मुले गप्पा मारताना त्यांना दिसली. या मुलांनी जाणीवपूर्वक मास्क घातला होता, हे पाहून सतेज पाटील यांनी आपली गाडी थांबवून, या मुलांचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला. या मुलांना कळते ते आपणाला का समजू नये, अशी भावनिक पोस्ट सतेज पाटील यांनी सोशल मीडियात केली. कोल्हापुरात ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्यक्त होताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणतात,

यांना कळलंय, आपल्याला समजलंय ना?

आज सकाळी बावड्यातून जात असतांना ही लहान मुलं दिसली. या सर्वांच्या तोंडाला मास्क पाहून थोडं बरं वाटलं.मित्रांच्यात गल्लीच्या कट्टयावर असताना यांच्या चेहऱ्यावर मास्क होता! त्यांचा फोटो काढायचा मोह मला आवरता आला नाही!

आपल्या नव्या पिढीला समजलं आहे की स्वतःची सुरक्षा कशी करायची, “न्यू नॉर्मल” मध्ये कसं जगायचं! ही मुलं “त्याला काय हुतंय” हा अविर्भाव न ठेवता, योग्य काळजी घेत आहेत! आपण सुद्धा अशाच प्रकारे आपली काळजी घ्या !! प्रत्येकाने असे नियम पाळले तर कोरोनाला आपण नक्कीच लवकर हरवू!

या फोटोतील मुलांमुळे मला खात्री वाटते, आपण नक्की जिंकूच! असा विश्वासही पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER