पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मिसळ पे चर्चेला शहरात उधाण

Satej Patil

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील जुने पण नावाजलेले हॉटेल विठ्ठाईमध्ये आज पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी शहरातील नगरसेवक माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांबरोबर मिसळवर ताव मारला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या या मिसळ पे चर्चेला शहरात उधाण आले.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाचा कार्यकाल १५ नोव्हेंबरला संपला आहे. महापालिकेची निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणी करत आहेत. आज पालकमंत्री सतेज पाटील हे शिवाजी पेठेतील पदवीधर मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले होते. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिवाजी पेठेतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल विठाईमध्ये मिसळचा आस्वाद घेतला.

यावेळी महापालिकेसाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने राजकीय गप्पांचा फड रंगला. माजी नगरसेवक उत्तम कोराणे, विक्रम जरग, शारंगधर देशमुख, अजित राऊत, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, दत्ता टिपुगडे, सचिन चव्हाण, संजय कुऱ्हाडे, इंद्रजित बोंद्रे, राहुल साळुंखे, प्रताप जाधव ,संजय पडवळे, राहुल माने, मंजित माने आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. त्यामुळं शहरात मिसळ पे चर्चेला उधाण आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER