पालकमंत्री सतेज पाटील मुंबईहून थेट पूरग्रस्तांचे भेटीला

Satej Patil

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) दोन दिवसापूर्वी मुंबई येथे बैठकीसाठी गेले होते. काला मंगळवारपासून धुवाधार पाऊस सुरू झाला. दरम्यान आज बुधवारी कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली. कोल्हापूरला महापुराचा धोका संभवत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारीच मुंबईतून कोल्हापूरकडे प्रस्थान केले. ते थेट कोल्हापुरात आल्यानंतर पूरग्रस्तांच्या भेटीसाठी धावले. पालकमंत्र्यांनी मुंबईहून प्रवास करून पूरग्रस्तांची व्यथा जाणून घेतली. पालकमंत्र्यांच्या या कृतीबद्दल कोल्हापुरात कौतुक होत आहे.

काल रात्रीपासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक शारंगधर देशमुख व राहुल चव्हाण यांच्यासोबत शहरातील काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, संभाव्य पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील उल्यानी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER