पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिल्ह्यात येऊ देणार नाही; मनसेचा इशारा

- कोरोना काळातील निष्क्रियतेबाबत संताप

Hasan Mushrif - Nitin Bhutare

अहमदनगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. प्रशासन काहीही हालचाल करताना दिसत नाही. फक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आल्यानंतर कडक लॉकडाऊन (Lockdown) करा, जनता कर्फ्यू पाळा असे आदेश प्रशासनाला देतात अणि निघून जातात! हे काहीच करणार नसतील तर त्यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही, असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे.

मनसेचे नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इतर देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या लाटा येत होत्या त्या वेळेस हे सरकार झोपले होते का? आज २००० लोक मेल्यानंतर पालकमंत्र्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची, जंबो कोविड सेंटर सुरू करण्याची उपरती होते आहे. हा प्रकार म्हणजे पालकमंत्र्यांचा स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे.

इथली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असताना अहमदनगरला आल्यावर मुंबईच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलता आणि कडक लॉकडाऊन, जनता कर्फ्यू नागरिकांनी पाळला पाहिजे, असे आदेश प्रशासन व नागरिकांना देऊन जाता.

तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना आजाराची परिस्थिती हाताळता येत नसेल तर पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात येऊ नका. काम करायचे असेल तर तुम्हाला आम्ही पालकमंत्री म्हणून स्वीकारू; अन्यथा येणाऱ्या काळात तुम्ही कोरोना आजारावर उपाययोजना राबविल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालकमंत्र्यांना अहमदनगर जिल्ह्यात येऊ देणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button