कोल्हापूर सांगलीसह पाच जिल्ह्यातील जीएसटी निम्म्यावर

GST

मुंबई : मागील सहा महिन्यांतील कोरोनामुळे (Corona) झालेल्या उद्योग, व्यवसायावर परिणाम म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा (Satara), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या पाच जिल्ह्यांतील उद्योग व्यवसायांची जीएसटी (GST) वसुली सुमारे 48 टक्क्यांनी घटली आहे. या पाच जिल्ह्यांतून वसूल होणाऱ्या जीएसटीमध्ये या काळात तब्बल 522 कोटी रुपयांची घट झाली आहे. तर पाच जिल्ह्यांतील उलाढाल सुमारे तीस हजार कोटी रुपयांनी कमी झाली.

सन 2019-20 या आर्थिक वर्षात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील जीएसटी वसुली 4,400 कोटी रुपये होती. त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा कोल्हापूरचा होता. कोल्हापुरातून सुमारे 2100 कोटी, सांगली 900 सातारा एक हजार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गची वसुली 510 कोटी रुपये होती.

गेल्यावर्षी एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांत या पाच जिल्ह्यांतून सुमारे 1400 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल गोळा झाला होता. त्यामध्ये कोल्हापूर 700 सांगली 300 सातारा 330 आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचा वाटा 170कोटी रुपयांचा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा त्याच कालावधीत जीएसटीमध्ये वाढ होणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात घट झाली. जीएसटीमध्ये घट होणे म्हणजे उद्योग व्यवसायावर मंदीचे सावट मानले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER