‘जीएसटी’मध्ये इंधनाचा समावेश नाही !

fuel-img

नवी मुंबई :- केंद्र सरकारने गेल्या वर्षी जीएसटी लागू केली होती. जीएसटी लागू झाल्यापासूनच पेट्रोल आणि डिझेलवर देखील जीएसटी लावण्याची मागणी करण्यात येत होती. याच अनुषंगाने अर्थमंत्री आणि अन्य नेत्यांनी वक्तव्यही केली होती. यामुळे प्रत्येकजण याची वाट पाहत होता. मात्र, राज्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे पेट्रोल आणि डिझेल कधीही जीएसटीच्या कक्षेत येणार नसल्याचे लक्षात येत आहे.

आशिया खंडातील इतर देशांपेक्षा काही पट जास्त दराने भारतात पेट्रोल, डिझेल विकले जात आहे. यामुळे जनतेतून पेट्रोल, डिझेलची जीएसटीमध्ये आणण्याची मागणी होऊ लागली होती. ४ ऑगस्टला झालेल्या जीएसटी काऊंस्लिंगच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उचलला गेला होता. अर्थ मंत्रालयाने अशक्य असल्याचे म्हंटले आहे.

केंद्र सरकार आणि राज्याचे पेट्रोल आणि डिझेल हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्यामुळे खरेदीपेक्षा तिप्पट किमतीने ते विकले जातात. हा फरक कराच्या रूपात सरकारी तिजोरीत जातो. केंद्र सरकारला जीएसटीखाली इंधन आणल्यास २० हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच राज्यही आपले उत्पन्न गमवू इच्छित नाहीत. सध्या पेट्रोलवर केंद्राला १९.४८ रुपये आणि डिझेलवर १५.३३ रुपये अबकारी कर मिळतो. त्यात राज्य सरकारे व्हॅट आकारात आहेत. हा कर जीएसटीच्या सर्वात जास्त असलेल्या २८ टक्केके टॅक्सपेक्षाही जास्त आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल जीएसटीखाली येते शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.