गरिब आणि श्रीमंतातली वाढतीये दरी, जगातील निम्म्याहून जास्त संपत्ती सात उद्योजकांकडे आहे

Rocha Mahiti-Maharashtra Today

आजच्या शतकातली सर्वात मोठी समस्या आहे गरिब आणि श्रीमंत यांच्यातली वाढती दरी (Growing gap between rich and poor,). जगभरातली निम्म्याहून जास्तीची संपती फक्त सात लोकं स्वतःकडे बाळगून आहेत. जगभरात श्रीमंत आणि गरिबांमधील आर्थिक विषमता वाढत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत असून गरिब दिवसागणिक गरीब होत आहे. विशेष म्हणजे जगभरातील अब्जाधीश उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ‘ऑक्सफॅम’ (Oxfam) या जागतिक संस्थेने जाहीर केलेल्या अति श्रीमंतांच्या यादीनुसार जगभरात आठ अब्जधीशांकडे जगातील एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती (६७०.८ अब्ज डॉलर्स) असल्याचं समजतं.

जेफ बेझॉस (११०. १ अब्ज डॉलर्स)

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जेफ बेझॉस यांची ओळख आहे. ‘ऑक्सफॅम’च्या यादीनुसार जगप्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी ‘अमेझॉन’चा मालक जेफ बेझॉस जगातील सवार्त श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझॉस यांच्याकडे ११०. १ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. १९९४ मध्ये बेझॉस यांनी अमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली. बेझॉस यांच्याकडे अमेझॉनचे १२ टक्के शेअर्स आहेत. जुलै २००९ मध्ये बेझॉस यांनी मॅकेंझी हिला २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट दिला. मॅकेंझी यांच्याकडे अमेझॉनची ४ टक्के मालकी असून त्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

बिल गेट्स (१०६.२ अब्ज डॉलर्स)

मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स सर्वाधिक काळ जगातल्या सर्वात श्रीमंत यादीत अव्वल स्थानावर होते. आता ते ऑक्सफॅमच्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. गेट्स त्यांच्या संपत्तीचे मूल्य १०६.२ अब्ज डॉलर आहे. गेट्स यांनी जगभरातील सामाजिक कार्यासाठी संपत्तीतील ३६ अब्ज डॉलर्सचे दान केलेंय. अन्यथा बिल गेट्स आजच्या घडीला सर्वात श्रीमंत ठरले असते. त्यांचे ‘बिल अँड मंडेला गेट्स फाउंडेशन’ भारतासह जगभरातील विकसनशील देशांमध्ये प्रभावीपणे काम करतं आहे.

बर्नाड अर्रनौल्ट (१०१.२ अब्ज डॉलर्स)

फॅशन आणि सौंदर्य प्रसाधनांमधील जागतिक ब्रँड असलेल्या लुईस वेईटन अँड सोफेरा या ब्रँडचे मालक असलेल्या बर्नाड अर्रनौल्ट यांच्याकडे १०१.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. फ्रेंच उद्योजक असलेल्या बर्नाड अर्रनौल्ट यांच्याकडे सौंदर्य प्रसाधनांचे ७० हुन अधिक ब्रँड आहेत. २०१८ मध्ये लुईस वेईटन अँड सोफेराने विक्रमी विक्री नोंदवली होती.

वॉरेन बफे (८४ अब्ज डॉलर्स)

गुंतणकीच्या क्षेत्रातील सर्वात प्रभावी व्यक्तीमत्त्व म्हणून वॉरेन बफे यांची ओळख आहे. लोकप्रिय गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफे सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. बफे यांनी मालमत्ता ८४ अब्ज डॉलर्स आहे. बफे यांनी वयाच्या अवघ्या ११ व्य वर्षी शेअर खरेदी केली होती. त्यांनी १३ व्या वर्षी कर भरला होता. बफे यांच्या मालकीच्या बर्कशायर हॅथवेकडे ६० कंपन्या आहेत. बफे ८९ वर्षांचे असले तरी त्यांचा गुंतवणुकीसंदर्भातील प्रत्येक शब्द गुंतवणूकदारांसाठी मोलाचा आहे.

अमॅनसिओ ऑर्टेगा (७० अब्ज डॉलर्स)

फॅशन म्हणजे झारा असं समीकरणं जणू बनलं होतं. भारतीय शहरांमध्ये या ब्रँडची चलती आहे. ‘झारा’ या प्रसिद्ध फॅशन ब्रँडचे मालक अमॅनसिओ ऑर्टेगा यांच्याकडे ७० अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ते जगातील सहावे सर्वाधिक संपत्ती असलेले श्रीमंत आहेत. ऑर्टेगा यांना वर्षाला तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्सचा डिव्हडंड मिळतो. हा निधी त्यांनी बार्सिलोना, माद्रिद, लंडन, शिकागो, न्यूयॉर्क या शहरांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवलाय.

लॅरी एलिसन (६७.३ अब्ज डॉलर्स)

भारतात टीकटॉक बॅन केल्यानंतर ऑरॅकल हे अॅप विकत घेईल अशी चर्चा होती. ती फक्त चर्चाच राहिली. डेटा बेस मॅनेजमेंटमधील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे सह संस्थापक असलेल्या लॅरी एलिसन यांची संपत्ती ६७.३ अब्ज डॉलर्स आहे. त्यांनी १९७७ मध्ये ओरॅकलची स्थापना केली होती. एलिसन यांची नुकताच टेलसाच्या संचालक मंडळात निवड झालीये.

गरिब आणि श्रीमंतातली ही वाढती दरी भविष्यात चिंतेचा विषय ठरेल असं सांगितलं जातंय. यावर उपाय निघणं तरी शक्य दिसत नसलं तरी यावर उपाय काढला नाही तर मात्र मोठी अराजक परिस्थीती निर्माण होऊ शकते हे मात्र निश्चित असल्याचं अर्थतज्ञांच मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button