शिवरायांना मोदी, राहुल गांधी, शरद पवारांनी केले अभिवादन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना (Chhatrapati Shivaji maharaj) अभिवादन केले. छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ शेअर केला. दुसरे ‘शिवाजी’ कोणी होऊ शकत नाही पण ‘सेवाजी’ मात्र होऊ शकतो, असं सांगत मोदींनी (PM Modi) सेवेचे महत्व अधोरेखित केले.

मोदींनी आपल्या संदेशात म्हणालेत की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील.


राहुल गांधी (Rahul Gandhi)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शौर्य, साहस आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा असे राहुल गांधी संदेशात म्हणालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील आणि देशातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले की, ‘जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!’


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER