रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टी ठरु शकते सुपर ड्रींक!

Maharashtra Today

कोरोनाची (Corona) दुसरी लाट महाराष्ट्रासह देशात थैमान घालत आहे. रुग्णांचा आलेख कमी येत असला तरी रुग्णांचं बाधित होण्याचं प्रमाण जास्तच आहे. अशा परिस्थीतीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्य सरकारनं निर्धास्त राहणं पसंद केलं. याचा सर्वात मोठा फटका सामान्यांना बसला. औषधांची कमतरता, बेड्सची जुळवा जुळव, ऑक्सिजन सिलेंडरपासून ते व्हिंटीलेटरपर्यंत सर्वच आघाड्यांवर राज्यसरकार तोंडघशी पडलंय. औषधांचा साठेबाजारी सुरु आहे. तिसऱ्या लाटेतही अशी वेळ आपल्यावर ओढावू नये म्हणून नागरिकांनी प्रयत्नाला सुरुवात केली आहे. वाढलेली रोगप्रतिकार शक्तीच कोरोना रोखू शकते हे गणित लक्षात आल्यामुळं रोगप्रतिका शक्ती वाढवणाऱ्या घटकांकडे सर्वांच लक्ष आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टी (Green Tea) उपयुक्त असल्याचं संशोधनातून पुढं आलंय. यामुळं अनेक जणांची रोगप्रतिकार शक्ती वाढणार (Super drink to boost the immune system) आहे. अनेक आजारांपासून वाचण्याची ताकद ग्रीन टीमध्ये असल्यामुळं ग्रीन टीकडे बघण्याच्या लोकांचा दृष्टीकोनच बदलला आहे. बाजारात ग्रीन टीनची वाढलेली मागणी याचा पुरावा आहे. ग्रीन टीचं नाव वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून घेतलं जातं. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी ग्रीन टी नैसर्गिक असल्यामुळं यामुळं शरिराला अपाय ही संभवत नसल्यानं ही चांगली गोष्ट असल्याचं बोललं जातंय.

रोगप्रतिकार शक्तीत होते वाढ

अनेक वैद्यकीय शोधांनी या अहवाला हिरवा कंदिल दाखवलेला आहे. ग्रीन टी मध्ये असणारे एंडी ऑक्सिडंट घटकांसोबतच कॅटेचीन नावाचं पॉलिफेनॉलचे तत्त्व आढळतात. यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. सोबतच ग्रीन टी मध्ये एंडी मायक्रोबियल असतात जे शरिरातले विषाणू आणि बॅक्टेरीयाशी लढतात. जर तुम्ही एक कप ग्रीन टी रोज पिता तर तुमच्या आरोग्याला याचा निश्चीत लाभ होईल. ग्रीन टीला सुपर ड्रींक बनवण्यासाठी या गोष्टी कराव्यात.

ग्रीन टीमध्ये तुळशीची १५ पानं टाकावीत. आल्लं, लिंबू, मध, लहान मेथीचे दाने, अश्वगंधा लिंबाची पानं, काळी मिरी, लवंग, कच्ची हळद, सुलेमानी मीठ, ताजी पानं घ्यावीत.

कसं बनवायचा ग्रीन टी

रात्री झोपन्या आधी एका भांड्यात लिंबाची पानं, १ चमचा मेथीचे दाने, अश्वगंधा, काळीमिरी, दालचीन, लवंग, आल्लं, कच्ची हळद या गोष्टी टाकून त्या भीज घालाव्यात. पुढच्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये याचं मिश्रण बनवावं. आता १५ मिनीटं पाण्यामध्ये या गोष्टी उकळाव्यात. यानंतर पाच मिनीट यावर झाकण झाकून ठेवावं. चहाच्या कपात लिंबू पिळून, त्यात मध, चिमटभर मीठ, पुदीन्याची तीन चार पानं टाकावीत. व्यवस्थीत याचे मिश्रण करुन सेवन करावं.

ग्रीन टी पिण्याचे फायदे

ग्रीन टी हृदयासाठी सर्वोत्तम असते. त्यामुळं रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. यशिवाय यातील अँटी ऑक्सिडंट, एंटी एजिंग घटक यात जास्त आढळतात. जे तुम्हाला कॅन्सरसारख्या भयानक रोगापासून दुर ठेवातात, या रोगाशी लढण्याची शक्ती देतात. पचनतंत्र सुव्यस्थित करतात. चेहऱ्यांवरील सुर्कुत्या कमी करतात. सोबतच अनेक रोगांपासून मुक्त होण्यासाठी ग्रीन टी वरदान ठरते. तुमच्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास ग्रीन टी उपयुक्त असते म्हणून ही ला इम्युनिटी बुस्टरही म्हणलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button