‘या’ वाहनांवर आकारला जाणार ‘ग्रीन टॅक्स’; केंद्राकडून राज्यांना प्रस्ताव

Green Tax - Nitin Gadkari - Maharashtra Today

नवी दिल्ली : रस्त्यांवर अजूनही १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या धावत आहेत. यात ४ कोटी गाड्यांचा समावेश आहे. ही वाहने ‘ग्रीन टॅक्स’अंतर्गत येतात. शहरांमध्ये सर्वाधिक जुनी वाहने असणाऱ्या कर्नाटक वरच्या स्थानी आहे. या रस्त्यांवर ७० लाख वाहने चालू स्थितीत आहेत. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात वाहनांचे आकडे डिजिटल केले आहे. यात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि लक्षद्वीप या राज्यांचे आकडे सामिल नाहीत.

यापूर्वीच, १५ वर्षे जुन्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ (Green Tax) लावण्याचा प्रस्ताव राज्यांना पाठवण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, ४ कोटीहून अधिक वाहने १५ वर्षांहून अधिक जुनी आहेत. यापैकी २ कोटी वाहने, तर २० वर्षांहून अधिक जुनी आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, जुन्या प्रदूषण करणाऱ्या वाहनांमध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. अशा वाहनांची संख्या ५६.५४ लाख आहे, ज्यात २४.५५ लाख वाहने २० वर्षांहून जास्त जुनी आहेत.

राज्यांना केंद्राकडून प्रस्ताव
सरकार पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी जुन्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याच्या तयारीत आहे. यावर्षी जानेवारीमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रदूषण पसरवणाऱ्या जुन्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव चर्चेसाठी राज्यांकडे पाठवण्यात आला आहे.

प्रस्तावाअंतर्गत, ८ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र रिन्यूवल करताना रोड टॅक्सच्या १० ते २५०टक्के दराने कर आकारला जाईल. १५ वर्षे जुन्या वैयक्तिक वाहनांवर हा कर आकारण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ कमी लावला जाईल. याशिवाय अधिक प्रमाणात प्रदूषित शहरांमध्ये नोंदवण्यात आलेल्या वाहनांवर रोड टॅक्सच्या ५० टक्के दराने कर आरारण्याचा प्रस्ताव आहे.

दिल्लीत ४९.९३ लाख जुनी वाहने असून ३५.११ लाख वाहने २० वर्षांहून जास्त जुनी आहेत. केरळमध्ये ३४.६४ लाख, तमिलनाडुमध्ये ३३.४३ लाख, पंजाबमध्ये २५.३८ लाख आणि पश्चिम बंगालमध्ये २२.६९ लाख अशी वाहने आहेत. तर महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान, हरियाणामध्ये जुन्या वाहनांची संख्या १७.५८ लाख ते १२.२९ लाख दरम्यान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button