आंबोली घाट पांघरला हिरवी चादर

Amboli
  • सिंधुदुर्गातील पर्यटनाचे एक महत्वाचे व ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत निसर्गाचे नयनरम्य रूप बहरले आहे.
  • सध्या जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू असून हिरवाईने नटलेल्या आंबोली घाट व महादेव गड परिसरावर ढगांची चादर पसरली आहे.
  • निसर्गाचे हे अद्भुत रूप घाटातून प्रवास करणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडते.
  • सध्या आंबोलीत ऊन-पाऊस, धुके आणि आंबोली घाटातील दरी ही ढगांनी भरली आहे.घाटाच्या टोकावरून ढग दरीत तरंगताना दिसतात !
  • कोकण भूमीत प्रवासी घाटमार्गात निसर्गाच्या अद्भूत सौंदर्याचा आनंद घेत आहेत.
  • कोरोनामुळे पर्यटन बंद असल्याने निसर्गाचा या अविष्काराचा पर्यटकांना अनुभवता येत नाही याची पर्यटकांना खंत आहे.
  • सर्व छायाचित्रे वन्य प्राणी छायाचित्रकार काका भिसे यांनी टिपली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER