महिन्यात कोल्हापुरात पूररेषा निश्चित करण्याचे हरित लवादाचे आदेश

Floodline in Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीतील पंचगंगा नदीलगत रेड लाईन व ब्ल्यू लाईन (पूररेषा) एक महिन्यात तसे पत्र प्रधान सचिवांनी पाठवावे, असे आदेश राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागास दिले आहेत.

ही बातमी पण वाचा:- ऑक्टोबर हिटची चाहूल

जलसंपदा विभागाच्यावतीने २००५ मध्ये पूररेषा निश्चित करण्यात आली. पंचगंगा नदीलगतच्या पूर प्रवण क्षेत्रामध्ये बिल्डरांनी रेड झोन नियमावलीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्यामुळे नदीचे प्रदूषण होत आहे. तसेच नदीची पूर प्रवण क्षमता कमी झाल्यामुळे पूराचा धोका येऊन मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकामांना अटकाव करण्यास महापालिकेला अपयश आले असून पंचगंगा प्रदूषणाबाबतही गांभिर्य नसल्याने डिसेंबर २०१८ मध्ये डॉ. बाळकृष्ण शेलार यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेच्या रेड झोनमध्ये जी अनधिकृत बांधकामे आहेत, त्याबाबत समक्ष उपस्थित राहून अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी २००५ सालच्या पूरानंतर रेड झोन क्षेत्रासाठी नेमलेल्या तज्ञ समितीने सुचविलेल्या उपाययोजना आणि त्या अनुषंगाने महापालिकेने केलेली कार्यवाही उपाययोजनांचा सविस्तर अहवाल नुकताच सादर केला आहे.