केंद्र सरकारला मोठं यश, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

केंद्र सरकारला मोठं यश, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला शांत करण्यात केंद्र सरकारला (Central Government) मोठे यश आले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने गेल्या १२ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग उघडण्यात आला.

शेतकऱ्यांचे ५ सदस्यांच्या टीमने संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटली. यावेळी झालेल्या बैठकीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांसमोर १८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्य मागणी शेतकरी आयोग स्थापन करण्याची आहे. किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) मागण्यांमध्ये उल्लेख नाही. आमच्या नेत्यांनी संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेतली. मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे, म्हणून आम्ही मार्ग मोकळा केला आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितलं. चर्चेनंतर नोएडाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावरील बॅरिकेड्स रात्री उशिरा हटवण्यात आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER