धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; रेणू शर्माकडून बलात्काराची तक्रार मागे

Renu Sharma - Dhananjay Munde

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा हिने मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणूने तक्रार मागे घेताना नमूद केले.

गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करून धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा हिच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणाची बहीण रेणूकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणूचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील १५ दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER