राज्यात आज मोठा दिलासा; दिवसभरात राज्यात ५९ हजार ३१८ रूग्ण कोरोनामुक्त

Coronavirus-Maharashtra

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ५९ हजार ३१८ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३४ हजार ३८९ नवीन करनोाबाधित आढळले आहेत. तर, ९७४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४८,२६,३७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८९.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८१ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,११,०३,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३,७८,४५२ (१७.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,९१,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८,३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,६८,१०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button