मोदी सरकारचा मोठा दिलासा; ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार

Food Grains - PM Narendra Modi

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने सामान्य जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशातील जवळपास ८० कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत धान्य दिले जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ही मदत दिली जाणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे.

मागील वर्षी लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्यानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यामुळे याच योजनेंतर्गत देशातील ८० कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळणार आहे. या वर्षीच्या मे आणि जून अशा एकूण दोन महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने तब्बल २६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मागील वर्षी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल झाले होते. अनेकांचे रोजगार गेले होते. तर कित्येक लोकांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही बातमी पण वाचा : ऑक्सिजन टँकर अडवल्यास केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा?; केजरीवाल यांचा पंतप्रधानांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button