सांगलीत शेतीचे मोठे नुकसान

सांगलीत शेतीचे मोठे नुकसान

सांगली : संपूर्ण सांगली (Sangli) जिल्ह्याला गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने (Heavy Rains) झोडपले आहे. दुष्काळी पट्टयात पावसाने दाणदाण उडवून दिली. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसाने ८०० हेक्‍टरवरील ऊस आडवा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका ६०० हेक्‍टर,डाळिंब १२०० हेक्‍टर, ज्वारी २०० हेक्‍टर, भाताचे ९० हेक्‍टरचे नुकसान झाले
आहे.

जिल्ह्यात गेली चार दिवस सुरु असलेल्या परतीच्या पावसाने कहरच केला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी हलका आणि आज बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून ती आजही कायम आहे. संततधार सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे-नाले पुन्हा वाहते झाले आहेत. डाळिंब, द्राक्ष, केळीसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. आजच्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीत भर पडणार आहे. या शिवाय सोयाबीन, केळी, भूईमुग, उडीद, बाजरी यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर असल्याचे स्पष्ट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER