शीख समाजाचे देशासाठी मोठे योगदान – मोदी

PM Narendra Modi

मुंबई :- देशासाठी शीख समाजाने (Sikh Community) मोठे योगदान दिले आहे. शिखांच्या या योगदानाचा देशाला अभिमान आहे. गुरू साहिब यांचे शब्द आणि आशिर्वाद आमच्यासाठी अनमोल आहेत, या शब्दात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी शीख समाजाचा गौरव केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणाला उत्तर देताना मोदी म्हणालेत की, शेतकरी आंदोलनासंदर्भात (Farmers Protest) शिखांबाबत जी भाषा वापरली जाते ती दिशाभूल करणारी आहे. त्याचा कुणालाही फायदा होणार नाही.

केंद्राच्या शेती कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांबद्दल मोदी सरकार असंवेदनशीलता आहे, असा आरोप करण्यात येतो आहे त्या संदर्भात मोदी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार, मनमोहन सिंग यांना कृषी धोरणावरून मोदींचे टोमणे आणि चिमटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER