फलोत्तमा चक्षुष्या – द्राक्ष ; नक्कीच घ्यावे

Grapes

द्राक्ष (Grapes) हे फळ बहुतेक सर्वांनाच आवडणारे. हिरवी, काळी द्राक्षे आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात. आयुर्वेदात काळी द्राक्ष व्याधी चिकित्सेत वापरण्यात येतात. द्राक्षांना फलोत्तमा म्हणजेच सर्व फळांमधे उत्तम म्हटले आहे. मधुर चवीची थोडी तुरट द्राक्षे वृष्य सांगितली आहे. डोळ्यांच्या आरोग्याकरीता उत्तम आहे.

  • द्राक्षे पोट साफ करतात त्यामुळे रोज थोडी खाल्यास मलमूत्र यांचे व्यवस्थित प्रवर्तन होते.
  • पिकलेली गोड द्राक्ष पित्तशामक तसेच रक्त वाढविणारी आहेत त्यामुळे लहान मुले, गर्भिणी, वृद्ध तरुण सर्वांनाच उपयोगी आहे. लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींचे पोट साफ होत नसेल तर द्राक्ष फायदेशीर ठरतात.
  • पिकलेली गोड द्राक्षे थंड असूनही खोकला, दमा, आवाज बसणे या व्याधी कमी करतात.
  • वारंवार तोंड कोरडे पडणे तहान लागणे तसेच उष्णता मलावरोध ही लक्षणे तापेमधे असतात अशावेळी द्राक्षाचे सरबत किंवा द्राक्ष कुस्करून त्यात धणेपूड घालून दिल्यास आराम पडतो.
  • लघवीत जळजळ होणे, लघवी कमी होणे अशा तक्रारीवर द्राक्षे खाणे वा सरबत घेणे फायदेशीर ठरते.
  • कोरडा खोकला, सतत खोकल्याची उबळ येणे यावर द्राक्ष सुंठ पिंपळी मिरे मध चाटण उपयोगी ठरते. क्षय रोगात द्राक्षाचा उपयोग केला जातो.
  • द्राक्ष शुक्रवर्धन, शरीरातील उष्णता कमी करणारे आहे. त्यामुळे गर्भ राहण्याकरीता पती पत्नीने रोज काळ्या मनुका किंवा काळी द्राक्ष खावीत.
  • द्राक्षासव द्राक्षारिष्ट, द्राक्षाघृत, द्राक्षावलेह, गुटी, कासहर योग द्राक्षापासून बनविल्या जातात.

द्राक्षापासून बनविलेले द्राक्षारिष्ट न अति उष्ण, मधुर, पोट साफ करणारे, रक्ताल्पता मूळव्याध कृमि रोगांवर उपयोगी आहे. असे हे फलोत्तमा वृष्या चक्षुष्या द्राक्षाफळ आहारात ऋतुनुसार नक्कीच घ्यावे.

ह्या बातम्या पण वाचा :

 

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER