नाशिकमध्ये ग्रेप पार्क : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरले – आदित्य ठाकरे

जागतिक पर्यटनदिन : मुख्यमंत्री ठाकरेंकडून राज्याला नाशिकमध्ये ग्रेप पार्क; खारघरमध्ये युथ हॉस्टेल गिफ्ट

World Tourism day

मुंबई : आज जागतिक पर्यटनदिन (World Tourism Day) आहे आणि योगायोगाने मुख्यमंत्र्यांचा लेक पर्यटनमंत्री. आज पर्यटनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नाशिकमधील ग्रेप पार्क (Grape Park), खारघरमधील एमटीडीसीच्या युथ हॉस्टेलचे उद्घाटन करण्यात आले.

पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेल्या युथ हॉस्टेलचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे खारघरमधील युथ हॉस्टेलमध्ये उपस्थित होते. युथ हॉस्टेलचे रविवारी दुपारी १२.३० वाजता उद्घाटन झाल्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

दरम्यान, नाशिकमध्ये एमटीडीसी ग्रेप पार्क आणि बोट क्लबचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. तत्कालीन पर्यटनमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER