द्राक्ष बागायतदाराना व्यापाऱ्यांची प्रतीक्षा

Grapes

सांगली : मोठ्या द्राक्ष व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन द्राक्ष (Grapes) खरेदी करण्याचे बंद केले आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रति चार किलोच्या एका द्राक्ष पेटीचा दर 450 रुपये होता, तो आता 135 रुपयांवर आला आहे. यातच दिल्लीतील व्यापारी न फिरकल्याने चीनसह युरोप आणि आखाती देशात पाठविण्यासाठी सिलेक्ट झालेल्या एक हजार एकरांहून अधिक द्राक्षबागांचा माल सध्या शेतात पडून आहे. यावर्षी जानेवारीत तेजीत सुरू झालेला द्राक्ष हंगाम व्यापारी न फिरकल्याने थांबला आहे.

केंद्र सरकारने जीई मार्केटची शृंखला निर्माण केली आहे. त्यामुळे भारतातील कानाकोपऱ्यात द्राक्ष तसेच इतर फळांचा दर ‘किसान अॅप’ वर समजतो. परिणामी मोठे व्यापारी शेतकऱ्यांचा माल योग्य दराने खरेदी करीत होते. परंतु दिल्लीचे मार्केट बंद असल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनीही या संधीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. एक तर हे व्यापारी दर पाडून मागत आहेत. शिवाय द्राक्ष दिल्लीचा मार्केट तसेच तिथून पुढे पंजाब, उत्तराखंड, नेपाळ, भूतान वगैरे शेजारी राष्ट्रांत जाऊ शकत नाही. अशा दुहेरी कात्रीत इथला द्राक्ष उत्पादक शेतकरी अडकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER