210 मराठी चित्रपटांचे अनुदान रखडले

Marathi films Grants

मुंबई : चित्रपटाचे परीक्षण करून निर्मात्यांना अनुदान दिले जाते. परंतू परीक्षणाअभावी सुमारे 210 मराठी चित्रपट (Marathi films) अनुदानापासून वंचित आहे. कोरोना महामारीचे कारण देत अनुदानासह ज्येष्ठ कलाकारांचे तीन महिन्याचे मानधन शासन दरबारी थकीत आहे. पैसे नसल्याचे सांगून चालढकल केली जात आहे. त्यामुळे शासनाने विशेष तरतूद करून चित्रपटांचे अनुदान (Marathi films Grants) व मानधन द्यावे, अशी मागणी चित्रपट सृष्टीतून होत आहे.

मराठी चित्रपटांच्या परीक्षणानंतर चित्रपटाचा दर्जा ठरवून अनुदान दिले जाते. गेल्या वर्षभरापासून 210 चित्रपटाचे अनुदान परीक्षणाअभावी सरकार दरबारी रखडलेले आहे. या चित्रपटाचे परीक्षण करुनन अनुदान देण्यास शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने विशेष तरतूद करून अनुदान द्यावे, यासाठी वारंवार पाठपुरावा सुरु आहे. सरकारने 2014 पासून चित्रपटांच्या गुणात्मक पध्दत लागू केली. यामुळे चित्रपटाच्या दर्जानुसार अनुदान दिले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER