७१ हजार रिक्षाचालकांच्या खात्यात अनुदान जमा; उर्वरित चालकांना अर्ज करण्याचे अनिल परब यांचे आवाहन

Anil Parab

मुंबई :- कोरोना (Corona) रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षाचालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. आतापर्यंत ७१ हजार रिक्षाचालकांच्या बँकेत रक्कम जमा केली आहे. २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केले आहे.

दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांना १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज ठाकरे सरकारकडून मंजूर करण्यात आले. राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बँकेत जमा होईल, अशी माहिती परब यांनी दिली.

बँकेत रक्कम जमा करण्याचे निर्देश
परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. तेथे २२ मेपासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत आहे. काही रिक्षाचालकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ४० रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले. यात १ लाख ५ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याबाबत NPCI (National Payment Corporation Of India) यांना कळविले आहे, अशी माहिती परब यांनी दिली.

आधार क्रमांक असणे अनिवार्य
याबाबतची संपूर्ण माहिती https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर आहे. अर्ज भरण्याकरिता परवानाधारक रिक्षाचालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तो क्रमांक बँक खात्याशी जोडणे/लिंक करणे अनिवार्य आहे. सोबतच मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करावा. यामुळेच ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्यात येत आहे, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button